Vaidic Sanskar-vastu tadnya,Vastu compliant Home,Vastu compliant Office,vastu consultant,interior vastu way,vastu compliant property,vastu energies,vastu shastra training,ENERGY BASE BRANDING

Grah Dhoop

The Grah Dhoop sticks are made from natural, sustainable planet sources.

Dikpal

Dikpal means a Protector of Direction.


Vaastu Nikshep Manjusha

Indian tradition deals in detail with Vaastu Shanti, a process of energization.

Auspiwatch

This is not just the watch, it is almost the map of the planet movement everyday

Orgone Energy Products

Dr. Wilhel Reich, M. D. of USA is just one of them who named it as 'orgone energy'.

Vaastu Consultancy

Our services include Vaastu Consultancy for Residential, Commercial, Industrial, Residential cum Commercial

Vaastu Solutions

Vastu-compliant-Office
Energy Based Branding

Are you looking out for strategic and scientific solutions for the growth of your business? 'Energy Based Branding' is the answer. Experience to Believe it!

Home >> About us >> Chronological Biodata>>Maharashtra Times 25 Feb 2006

Maharashtra Times 25 Feb 2006

कुलकर्ण्यांचे मनमोहक घर

अलीकडच्या काळातील मराठी चित्रपटांचा तटस्थपणे आढावा घेतला जाईल तेंव्हा काही नावे आवर्जून घ्यायला लागतील. अभिनय क्षेत्रातील संदीप कुलकर्णी हे त्यातीलच एक महत्वपूर्ण नाव म्हणायला हवे. श्‍वास, डोंबिवली फास्ट, साने गुरूजी या मराठी चित्रपटांतून सकस अभिनय करणारे संदीप कुलकर्णी घर सजवतानाही तोच मापदंड लावतात.

व्यक्तिरेषा साकारतानाचा स्वाभाविकपणा घरालाही हवा असा त्यांचा आग्रह आहे. अंधेरी जे.व्ही. लिंक रोडवरील ग्रिन फिल्ड टॉवर मधील ७०० चौरस फुटांचे घर पाहिल्यावर पाहणारयाला तो प्रत्यय येतोच. घेल्या दिड वर्षापासून संदीप, त्याची पत्नी कांचन आणि मुलगा वृंदार इथे रहात आहेत.

यापूर्वी ते इथूनच पंधरा मिनिटांच्या अंतरावरील हाऊसजवळच्या घरात रहात होते. त्याघरात त्यांची आईसुद्धा सोबत रहात होती. संदीपच्या मित्रांसाठी पंपहाऊसचे घर ‘भेटण्याचा अडडा’ होता.

संदीपचा ऐन उमेदीचा काळ त्या घरात गेल्यामुळे त्याविषयी आठवणींचे मोहोळ त्याच्या मनात उठणे साहजिक आहे. कामाचा व्याप वाढल्यावर मात्र संदीपला घर बदलावेसे वाटू लागले. पंप हाऊसला जाणारा रस्ता ‘बॉटल लिंक’ सतत ट्राफिकमध्ये अडकून पडायला लागायचे. तो त्रास टाळण्यासाठी त्याने नवीन घर घेतले. आईचे मन त्या घरात गुंतल्यामुळे तिने तिथेच रहाणे पसंत केले.

लिफ्टची वाट पहायला नको म्हणून पीहल्या मजल्यावरील घर त्याने निवडले. कांचन आणि वृंदारच्या दृष्टिनेही पहीला मजला सोयीस्कर होता.

आगंतुकाचे स्वागत करण्याची कुलकर्ण्यांची पद्धत खास आहे. मुख्य दरवाजाबाहेर नावच्या पाटी ऐवजी ‘अथर्व शिर्ष्याचे’ शब्द आपले लक्ष वेधून घेतात. घरात प्रवेश केल्यावर अर्थातच दिवाणखाना आपल्याला खुणावतो. बाजूलाच रंगीबेरंगी काचेचे पार्टिशन दिसते.

संदीप आणि कांचन दोघेही जे.जे. महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेत हे घरातल्या सजावटीवरून न सांगताच समजते.

संदीपने स्वयंपाकघर आणि हॉलमधील अर्धी भिंत तोडल्याने दोन्ही खोल्या आपेक्षेप्रमाणे मोठया दिसायला लागल्यात. निर्सगाच्याजवळ जाणे या कुटूंबाचा विकपॉईन्ट. त्यामुळे घरच्या सजावटीत नॅचरल वुडचा वापर ‘मस्ट’ होता. सुरूवातीलाच ग्लास पार्टीशनखाली लकडाचे कप्पे केले गेले. शिवाय त्यांच्या टॉपवर बसताही येते. प्रसंगी फळे किंवा शोभेच्या वस्तू ठेवण्यासाठीही उपयोग होतो.

घराच्या एकूण रंगसंगतीमध्ये सुसूत्र पणा असायला हवा म्हणून भिंतीना ऑफ व्हाईट रंग दिला गेला. जमिनीवर मार्बल बसवले गेले आणि फर्निचरसाठी नॅचरल वुड वापरण्यात आले.

हे घर सजवण्याची जबाबदारी कांचनने घेतली होती. संदीपचा तिच्यावर पूर्ण विश्‍वास होता.

संदीपच्या मते घराचे चौरस फूट कमी असल्यामुळे घरात सामानाचा पसारा नको होता. दिवाणखाण्यात तर एकच वॉल युनिट ठेवण्यात आले आहे. यात मधल्या मोठया कप्प्यात टी.व्ही. बाजूला सीडीज तर इतर छोटया छोटया कप्प्यांमध्ये वेगवेगळया प्रदर्शनातून आणलेल्या अँटिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

खोडकर वृंदारला वावरायला मोकळी जागा हवी म्हणूनदेखील संदीप व कांचनने फर्निचरचा पसारा मांडलेला नाही. घरात मोकळी हवा असायला हवी यासाठी घराची खिडकी मोठी करून घेतली आहे. संगमरवरावर बसवलेल्या या खुर्चीत पूर्वेकडून येणारया कोवळया सूर्यकिरणांची मजा लुटता येते. याच खिडकीत बसून पुस्तके वाचायला संदीपला आवडतात.

दिवाणखान्यातील संदीपची आणखी एक आवडती जागा म्हणजे ‘तागाचा झोपाळा’ वृंदार कांचनलाही इथे झोके घ्यायला फार आवडते. हॉलमध्ये टांगलेल्या तागाच्या झोपाळयात बसणे वृंदार बरोबरच सर्वांनाच आवडते.फरिीअवाढव्य जागा व्यापणारा सोफा खुर्च्याऐवजी खाली रजई अंथरून त्यावर ठेवलेल्या दोन कूशन्समुळे खूप मोकळेपणा वाटतो. भिंतीचा रंग सौम्य असल्याने गडद रंगाचे कुशन्स आणि पडदयाची रंगसंगती ही कांचनची कल्पना आहे.

भिंतीवरील लाकडाच्या घडयाळाने हॉलमधील्या भिंतीचा लुक हाटकेच आहे. लिहण्यासाठी खुर्ची आणि छोटे टेबल खिडकीच्या एका कोपरयात आहे. या टेबलावर हाताखाली लागणरी पुस्तके आहेत. वृंदारची खोळणी ठेवलेली आहेत. लाकडांच्या खेळण्यांचा भरणा त्यात अधिक आहे. त्याच बरोबर भोपळयाच्या एका प्रदर्शनातून मिरेचे चित्र असलेली लाकडाची फ्रेम आहे. शिवाय एक आफ्रिकन मॅनही ठेवला आहे. हिरवाई आवडते म्हटल्यावर तेथे झाडे आणि रोपे नाही असे होणे शक्य नाही. कपाटाच्या कुंडयांमध्ये अँथेरियम गुलाब ठेवला आहे.

खिडकीला लावलेल्या उभ्या ग्रीलमुळे ती निरस वाटू नये म्हणून खिडकीत मातीचे दिवे टांगले आहेत. ग्रीलमध्ये अडुळसा तुळशीच्या कुंडया ठेवल्या आहेत. खिडकीच्या प्लॅटफॉर्मवर लाकडाची बैलगाडी ठेवलेली असून त्यात मनी प्लान्ट ठेवला आहे.

लाईट लावल्यानंतर घरातले वातावरण प्रखर न वाटता सौम्य असावे या करता येथे लावलेल्या टयुब लाईट्सही पिवळसर रंगाच्या आहेत. हॉल आणि किचनच्या मधोमध बसवलेल्या स्पॉट लाईटचा प्रकाश मार्बलवर पडला की घरात एक रिच फिल येतो.त्यासाठीच संदीपने मार्बल निवडला आहे. किचन आणि हॉलच्यामधील भिंती हलवल्याने कोणालाही किचनमध्ये सहज वावर करता येतो. पण बेडरूमची प्रायव्हसी मात्र पूर्णपणे पाळली आहे. बेडरूममध्ये कपाट बेड वुड फर्निचरचेच आहे. ड्रेसिंग टेबल दरवाज्यामागे असल्याने बरीचशी मोकळी जागा वावरायला मिळते. किचन टेबलच्या खालच्या कप्प्यात सर्व सामान व्यवस्थित बसल्याने येथेही पसारा होत नाही. भिंतीना लाकडी कपाटे बनवून त्यात का्चेची भांडी ठेवलेली आहेत.

कुलकर्ण्यांच्या घरात कायमस्वरूपी फर्निचर नसल्याने हॉलमधल्या वस्तूंची जागा बदलून नवीन लुक आणता येतो.

संपूर्ण घर जरी वास्तुशास्त्रानुसार ठेवता येत नसले तरी संदीप कांचनने वास्तुशास्त्राची यंत्रे योग्य त्या दिशांना भिंतीवर लावली आहेत.म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार देव्हारा किचनमध्ये पश्‍चिमेकडे तोंड करून बसवण्यात आला आहे. ‘माझी आई ही शिस्तप्रिय असल्याने घरात कागदाचा बोळाही तिला सहन व्हायचा नाही आणि त्यामुळे मलाही घरात पसारा आवडत नाही’. जास्त अडगळ नसल्याने घरात घरात जास्त कचरा जमत नाही आणि धूळ एक हात फिरवून साफ होते असे कांचनने सांगितले.
डोंबिवली फास्टचा प्रवास करून आल्यावर संदीप कांचन आणि वृंदारच्या टुमदार घरात श्‍वास घेणे फारच मंत्रमुग्ध वाटते.

Disclaimer | Sitemap

© Copyright 2010, Vaidic Sanskar Architectonics (I) Pvt. Ltd., All Rights Reserved.